नितीन गडकरी यांच्या रुपाने महाराष्ट्रातील कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नितीन गडकरी हे केवळ ‘मॅन ऑफ व्हिजन’ नसून ‘मॅन आफ ॲक्शन’ आहेत. हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे अफाट कार्य त्यांनी केले आहे.  लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार -२०२५  त्यांना प्रदान करणे हा एका कृतीशील आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री तथा ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक, आमदार विजय शिवतारे, भीमराव तापकीर, विश्वजीत कदम, बापूसाहेब पठारे, हर्षवर्धन पाटील, प्रकाश जावडेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *