निशांची” — अनुराग कश्यप दिग्दर्शित एक प्रभावी क्राइम ड्रामा, अमेझॉन एमजीएम स्टुडिओजकडून १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने आज जाहीर केले की त्यांचा बहुप्रतिक्षित थियेट्रिकल चित्रपट ‘निशांची’ यंदा १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि जार पिक्चर्सच्या बॅनरखाली, अजय राय आणि रंजन सिंग यांच्या निर्मितीत तयार झालेला हा चित्रपट, फ्लिप फिल्म्सच्या सहकार्याने साकारण्यात आला आहे.

चित्रपटातून ऐश्वर्या ठाकरे दमदार पदार्पण करत असून, त्यांच्या सोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद ज़ीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा हे महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

‘निशांची’ ही एक सशक्त आणि उत्कट क्राइम ड्रामा कथा असून, दोन भावांच्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांची, वेगवेगळ्या आयुष्याच्या वाटांवर चालत असताना त्यांच्या निर्णयांनी त्यांच्या आयुष्यावर कसे परिणाम होतात, याचे प्रभावी चित्रण करते. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर प्रेक्षकांना एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देईल, अशी खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *