लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही पुष्पहार अर्पण करुन लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन केले.

मरळी (दौलतनगर) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

पुष्पवृष्टी झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पोलीस बॅन्ड पथकाने मानवंदना दिली.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्वप्नातील पाटण घडविण्यासाठी कटीबद्ध आहे. त्यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून पाटण तालुक्याचा विकास केला. त्यांनी घालून दिलेल्या विचारांवरच मी काम करित आहे. पाटणच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करेन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *