पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात लोकांमध्ये प्रभवीपणे पोहचवावा – कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात प्रभवीपणे पोहचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व जिल्हास्तरीय समित्यांनी समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासाचा विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शनाचा लोक कल्याणकारी विचार युवापिढी पर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आणि राज्यातील युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर  एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी समितीच्या कामाचा आढावा घेतला . ॲडिशनल एमआयडीसी सातारा  येथील मास भवन या ठिकाणी झालेल्या या बैठकीस आमदार मानोज घोरपडे, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, पोलीस उपअधीक्षक अतुल सबणीस, कौशल्य विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सुनिल पवार,  उद्योग विभागाचे सहसंचालक चंद्रकांत ढेकणे,प्रिया महेश शिंदे, विक्रम पावसकर, अशासकीय सदस्य, विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते .
यावेळी मंगलप्रभात लोढा म्हणाले,  पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन संकल्पना, त्यांचे जीवन कार्य विचारप्रणाली समाजासमोर जावी यासाठी राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावरती समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. त्यांतर्गत विविध उपक्रम राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. यामध्ये महाविद्यालय स्तरावर, शाळा व विविध मंडल स्तरावर, आश्रमशाळा, अंगणवाड्या अशा सर्व स्तरावर एकात्म मानव दर्शन विषयक निबंध, वक्तृत्व, पोस्टर, प्रश्नमंजुषा कथकाथन स्पर्धा, परिसंवाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. पंडित दिनदशळ उपाध्याय यांचे कार्यविचार प्रणाली यांची माहिती शालेय विद्यार्थी, कामगार, महिला, शेतकरी आदी सर्व घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी 1 लाख पुस्तके प्रकाशित करुन त्यांचे वितरण करण्यात यावे. त्यासाठी जिल्हा नियोजन मधील निधी उपयोगात आणावा. येणाऱ्या गणेशोत्सवामध्येही गणेश मंडळांच्या माध्यमांतून लोकांमध्ये याबद्दल माहितीचा प्रसार करण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *